Home क्राईम जोगलखेडा येथे विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

जोगलखेडा येथे विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू


परोळा प्रतिनिधी । तालुक्यातील जोगलखेडा येथील ३० वर्षीय तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना २१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील अनिल सुरेश पाटील (वय-३०) रा.ढेकू सीम ता.पारोळा हे साडून संदीप पंढरीनाथ पाटील यांच्या घराच्या कामानिमित्त स्टाईल बसविण्यासाठी आले होते. घराच्या छताच्या कामानिमित्त गेले असता त्यांन लोंबकळणाऱ्या तारांना धक्का लागल्याने खाली पडले. त्यांना तातडीने पारोळा कुटीर रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांनी मृत घोषीत केले. पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अशीष चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound