Home Cities भुसावळ मुख्यमंत्र्यांच्या भुसावळ दौर्‍यासाठी काटेकोर नियोजन- प्रा. सुनील नेवे (व्हिडीओ)

मुख्यमंत्र्यांच्या भुसावळ दौर्‍यासाठी काटेकोर नियोजन- प्रा. सुनील नेवे (व्हिडीओ)

0
47

भुसावळ संतोष शेलोडे । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भुसावळ येथील दौर्‍यासाठी अतिशय काटेकोरपणे नियोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांचे भुसावळ व धरणगाव येथे जाहीर कार्यक्रम आहेत. यात भुसावळ येथील मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या यशस्वीतेसाठी आपल्या अचूक नियोजनासाठी ख्यातनाम असणारे नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांनी आपल्या सहकार्‍यांसह काटेकोर नियोजन केले आहे. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भुसावळला येत असल्यामुळे त्यांच्या या दौर्‍याला यशस्वी करण्यासाठी विविध पातळ्यांवरून नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. नेवे यांनी या मुलाखतीत दिली.

पहा– प्रा. सुनील नेवे यांनी केलेल्या नियोजनाबाबतची माहिती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound