नागपूर (वृत्तसंस्था) आम्ही अपील करून, जागोजागी जाऊन लोकांना कोरोनाबाबत सांगत आहोत. सर्व करूनही लोकांना कळत नसेल तर जबरदस्ती लोकांना घरी बसवायला लागेल. तसेच आम्हाला असे करण्यास भाग पाडू नये, अशी विनंती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे.
कृपया कोणीही घराबाहेर पडू नये. नागरिकांनी इतरांनाही हे आवाहन करावे. करोनाला आळा घालण्यासाठी हे आवश्यक आहे. आम्ही पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष देऊन आहोत. संपूर्ण परिस्थितीचा आढावाही घेत आहोत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण ती नियंत्रणाबाहेर जाऊ द्यायची नाही. आम्हाला साथ द्या. पोलिसांची पेट्रोलिंगही वाढवण्यात आली आहे. आता नागरिकांनी लॉक डाऊनचा समजून घेतला पाहिजे. सर्वांनी आपल्या घरात राहावे. या विषाणूची लागण कोणालाही होऊ नये हा यामगचा उद्देश आहे. सरकारने नागरिकांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे, असेही मुंढेनी सांगितले.