चाळीसगावात पोलीस बॉइजतर्फे कोरोनाबाबत जनजागृती

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस बॉइज विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये व नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, यासाठी बॅनर द्वारे जनजागृती केली. या उपक्रमाचे खा. उन्मेश पाटील आणि उमंग महिला परीवार अध्यक्षा संपदा पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले.

संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असताना राज्यात राज्य सरकारने खबरदारी म्हणून सार्वजनिक जागी नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियम लागु केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने पुणे ,पिपरी चिंचवड, मुंबई, नागपूर ही चार शहरे लॉक डाऊन केले आहे तसेच राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता ज्या ठिकाणी गर्दी होईल अशा ठिकाणी म्हणजेच यात्रा, देवस्थान, विवाह कार्य, सार्वजनिक कार्यक्रम, बाजार पेट बंद करण्याचे आदेश पारीत केले असुन जिल्हाधिकारी जळगाव यांनी तसे आदेश दिले आहेत.

याप्रसंगी वाहतुक शाखेचे सपोनि किर्तीकर, रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, पत्रकार अर्जुन परदेशी, शहर वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content