Home राजकीय कमलनाथ येत्या १५ ऑगस्टला मुख्यमंत्री म्हणून ध्वजारोहण करतील ; कॉंग्रेसचे ट्विट

कमलनाथ येत्या १५ ऑगस्टला मुख्यमंत्री म्हणून ध्वजारोहण करतील ; कॉंग्रेसचे ट्विट


भोपाळ (वृत्तसंस्था) येत्या १५ ऑगस्टला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ ध्वजारोहण करतील. तसेच हा अल्पविश्रांतीचा काळ असल्याचे ट्विट कॉंग्रेसने केले आहे. एवढेच नव्हे तर, हे ट्विट सांभाळून ठेवा असेही कॉंग्रेसने म्हटलेय.

 

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन . येत्या १५ ऑगस्टला मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ ध्वजारोहण करतील असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. इतकचं नाही तर सध्या काही काळ विश्रांती आहे, असे ट्विट करण्यात आले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील राजकीय द्वंद पुढील काही महिने चालूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहे.


Protected Content

Play sound