Home क्राईम पिंप्राळ्यातून दुचाकी लंपास; पोलीस ठाण्यात गुन्हा

पिंप्राळ्यातून दुचाकी लंपास; पोलीस ठाण्यात गुन्हा

bike thieves 20180259850
bike thieves 20180259850

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा परीसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंप्राळा येथील बाजारपट्टा परिसरात उदयकुमार पाटील हे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ते नवीन बी.जे. मार्केट येथे दुचाकीने (एमएच १९ बीएल ५३९२) गेले होते. सायंकाळी ७ वाजता ते कामावरून घरी परतले. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी घराजवळ उभी केली होती. दरम्यान, जेवण झाल्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले. आजू-बाजूला शोध घेतला असता ती मिळून न आल्याने ती चोरीला गेल्याची खात्री झाली. अखेर शुक्रवारी दुपारी उदय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound