जळगाव प्रतिनिधी । शहरातील जूने बसस्थानकाच्या मागील बाजूच्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या पाच जणांवर शहर पोलिसांकडून गुरुवारी रात्री ८.३० वाजता कारवाई करण्यात आली.
सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना गुरुवारी दिली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील रतन गिते, नवजीत चौधरी, तेजस मराठे यांना गुरूवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जुने बसस्थानक परिसरात योगेश हटकर (३०, रा.खेडी बुद्रूक, जळगाव), पांडूरंग पाटील (४०, रा. त्रिभवन कॉलनी), छोटू मोहम्मद तडवी (४०, रा.नाथवाडा), अमोल सुरवाडे (१८, आंबेडकरनगर) तसेच पंकज सपके (२८, रा. जोशीपेठ) हे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आले. या ५ जणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यमान न करण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक अरूण निकम यांनी केले आहे.