Home धर्म-समाज सैन्यदलात निवड झाल्याबद्दल विशाल अडकमोलचा फैजपूर येथे सत्कार

सैन्यदलात निवड झाल्याबद्दल विशाल अडकमोलचा फैजपूर येथे सत्कार


फैजपूर (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील वढोदा येथील विशाल वसंत अडकमोल या तरुणाची भारतीय सैन्यदलात (आर्मी) निवड झाली आहे. याबद्दल त्याचा नुकताच फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती गृप कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष बी.के.काका चौधरी, खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्यासह मानवाधिकार फोरम जिल्हाध्यक्ष संदिप पाटील, निवृत्त शिक्षक सुरेश धोंडु चौधरी, छाया फिरके, वसंत चौधरी,पल्लवी चौधरी, अपंग संस्थेचे एहसान कुरेशी, देवेंद्र झोपे सर, सुनिल जोगी,नाझीम शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विशाल यांचे वडील वसंत अडकमोल यांनी सांगितले की, लहानपणापासूनच विशालची भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याची मुलाची इच्छा होती. मेहनत आणि जिद्दीने यशाचे हे शिखर विशालने गाठले आहे. दरम्यान, मी धनाजी नाना महाविद्यालयाचा विद्यार्थी असून देशसेवेसाठी सैन्यात संधी मिळाल्याने जिवनाचे सार्थक झाल्याचे विशाल यावेळी म्हणाला. सैन्यदलात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा प्रकारे जवानांचा सत्कार आयोजित केल्याबद्दल जवान विशालने खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे आणि गृपचे आभार मानले.


Protected Content

Play sound