जळगाव प्रतिनिधी । सोने खरेदी करण्यासाठी आणलेली रक्कम घरी घेवून जात असतांना डिक्कीत ठेवलेली रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिध्दार्थ शेखर प्रभुदेसाई (वय-३५) रा. प्रभुदेसाई कॉलनी, मधुबन अपार्टमेंट जवळ यांचे मेडिसीन डिलर व मेडिकल दुकान आहे. १६ मार्च रोजी घरून मेडीकल दुकानावर जात असतांना सोने खरेदी करण्यासाठी घरातून त्यांनी १ लाख ७० हजार रूपयांची रोकड घेवून गेले. मात्र सिध्दार्थ यांच्या वडीलांना सोने खरेदी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. सायंकाळी घरी जातांना आणलेली १ लाख ७० हजार रूपयांची रोकड आणि दिवसभरातील मेडीकलवर आलेला गल्ला असे एकुण २ लाख ७० हजार रूपये रेक्झीन बॅगमध्ये भरीत दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीझेड ६५५६) वर निघाले. त्यावेळी रक्कम डिक्कत ठेवली होती. घरी जातांना खॉजामिया चौकजवळ युनिटी चेंबर समोर असलेले गौरव मेडीकल येथे औषधांची पार्सल माल द्यायचा असल्याने त्यांनी दुचाकी गौरव मेडिकल दुकानासमोर रात्री ९.४५ वाजता गौरव मेडिकलवर जावून औषधाची पार्सल दिले. त्यानंतर ते पुन्हा घराकडे निघाले. घरी गेल्यावर त्यांनी गाडीची डिक्की उघडून बघितले असता डिक्कीतील रोकड लंपास केल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान जिल्हा पेठ पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता या दोघेजण दुचाकीने आले आणि डिक्कीतील रक्कम काढून भुसावळकडे रवाना झाले.