बेंगळुरूत विमानांची टक्कर (व्हिडीओ)

0
47


बंगळुरू वृत्तसंस्था । येथील एयर शोच्या दरम्यान दोन विमानांची टक्कर होऊन एक वैमानिक मृत्युमुखी पडला असून हा सर्व प्रकार चित्रीत करण्यात आला आहे.

बेंगळुरू शहरातील एअर शोदरम्यान सराव सुरू असताना हवाई दलाच्या दोन सर्यकिरण विमानांची टक्कर झाली. विमानांची टक्कर झाल्यानंतर दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटचा वापर करत उड्या घेतल्या. मात्र यातील एकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका नागरिक जखमी झाल्याची माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली. कोसळलेल्या विमानांचे भाग येलाहंकाजवळच इस्रो लेआऊटजवळ सापडले. दरम्यान, हा सर्व प्रकार चित्रीत करण्यात आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

https://www.facebook.com/armedforcesofindia/videos/641302526307508/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here