Home आरोग्य मुंबईतील लोकल ७ दिवस बंद ठेवल्यास कोरोना संसर्ग रोखण्यात मोठी मदत होईल...

मुंबईतील लोकल ७ दिवस बंद ठेवल्यास कोरोना संसर्ग रोखण्यात मोठी मदत होईल : पंकजा मुंडे


मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील लोकल ट्रेन ७ दिवसांसाठी बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल,असे मत भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर व्यक्त केले आहे.

 

पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर हे नियोजनबद्धपणे मुंबई बंद केली तर लोक यासाठी तयारी म्हणून जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. जर ७ दिवसांसाठी लोकल ट्रेन बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल. आवश्यक दुकानं उघडी ठेवता येतील, मात्र शॉपिंग बंद ठेवावी. अशा प्रयत्नांचा नक्कीच उपयोग होईल. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचीही मागणी केली होती. तसेच लोकांनी विनाकारण गर्दी करू नये आणि यंत्रणांवर ताण पडू देऊ नये. कोणाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काळजी घ्या. शक्य तो घरी थांबा, असेही आवाहन पंकजा मुंडे यांनी आधीच केले होते.


Protected Content

Play sound