नागपूर (वृत्तसंस्था) लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा एका तरुणाने शॉपिंग मॉलच्या बेसमेंटमध्ये गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना नागपुरात सोमवारी उघडकीस आली आहे.
सोमवारी सकाळी मंगळवारा परिसरातील एका शॉपिंग मॉलच्या बेसमेंटमध्ये हुस्न किस्मत (वय २१) नावाच्या युवतीचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी करून आसिफ शेख (वय २६) या तरुणाला अटक केली. आसिफ आणि हुस्न हे दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. काल रात्री ते मंगळवारी परिसरात ते भेटल्यावर त्यांच्यात वाद झाला. आसिफने आपल्याशी निकाह करावा, यासाठी हुस्न तगादा लावत होती, असा आसिफचा दावा आहे. त्यातून वाद होऊन ओढणीचे गळा आवळून खून केला,असे त्याने कबूल केले आहे.