नवी दिल्ली । कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता केंद्र सरकारने यामुळे मृत्यू झाल्यास संबंधीत रूग्णाच्या आप्तांना चार लाख रूपयांची शासकीय मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
कोरोनाचा देशातील संसर्ग वाढू लागला असून यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. देशभरात सर्वत्र यापासून बचाव व्हावा म्हणून सतर्कता बाळगण्यात येत आहे. दरम्यान, एकीकडे उपाययोजना सुरू असतांना केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधीत रूग्णाच्या वारसदारांना चार लाख रूपयांची शासकीय मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मृह मंत्रालयाने याबाबत घोषणा केली आहे.