Home Cities भुसावळ विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य फालक यांची निवड

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य फालक यांची निवड

0
33

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेचे सदस्य असलेल्या प्राचार्यांमधून राजू फालक यांची बिनविरोध निवड झाली.

अधिसभेचे सदस्य असलेल्या प्राचार्यांमधून व्यवस्थापन परिषदेवर इतर मागास प्रवर्गातून एक सदस्य निवडून द्यावयाचा होता. त्यासाठी विद्यापीठाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य राजू फालक यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. अधिसभेच्या बैठकीत प्राचार्य फालक यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी जाहीर केले. प्राचार्य फालक यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी प्राचार्य आर.एस. पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी प्राचार्य फालक यांचे स्वागत केले.


Protected Content

Play sound