पाचोरा येथे काँग्रेसचे वीज कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील काही गावांमध्ये वीज वितरण कंपनीच्या मनमानीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून समस्यांचे निराकरण करण्यासाठी काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

विद्युत महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हातात आलेला शेतीचा माल वाया जाण्याची वेळ आली होती. महिनाभरापासून काही गावातील रोहित्र जळाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपली कैफियत काँग्रेसच्या राहुल गांधी युथ ब्रिगेडचे महाराष्ट्र अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याकडे मांडली. त्यांनी तत्काळ विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकर्‍यांना बरोबर घेऊन ठिय्या आंदोलन केले. कनिष्ठ अभियंता आर. डी. ठाकरे यांनी तत्काळ मागणीची दखल घेतली. त्यानंतर पिंप्रीतील शेतकर्‍यांचा १०० एचपीचे रोहित्र बसवण्यात आले. तर नेरी आणि शिवणी येथे ६३ एचपीचे रोहित्र बसवले जाणार आहे.

याप्रसंगी सचिन सोमवंशी यांच्यासोबत लहू पाटील, विजय सूर्यवंशी, सोमा अहिरे, साहेबराव बोरसे, दिलीप पाटील, काशिनाथ अहिरे, बंटी भोई तर पिंप्री येथील वामन पाटील, दत्तू पाटील, कडूबा पाटील, भास्कर कोठावदे, कैलास पाटील, मिथुन पाटील, चुडामन पाटील, मधुकर पाटील, संतोष पाटील, शिवणीचे रवींद्र अहिरे, लक्ष्मण माळी, राजेंद्र जाधव, पप्पू सोनवणे, जिभाऊ माळी, राकेश माळी, एकनाथ गांगुर्डे आदी शेतकरी उपस्थित होते.

Protected Content