Home अर्थ अर्थमंत्र्यांचे आजचे उत्तर दिशाभूल करणारे : देवेंद्र फडणवीस

अर्थमंत्र्यांचे आजचे उत्तर दिशाभूल करणारे : देवेंद्र फडणवीस

0
28


मुंबई (वृत्तसंस्था) अर्थमंत्री अजित पवार यांनी आज उत्तरात जी आकडेवारी दिलीय ती दिशाभूल करणारी असून हे उत्तर नसून केवळ राजकीय भाषण आहे. दरम्यान, विरोधी पक्षाने अर्थमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान झाले नसल्याचे सांगत सभात्याग केला.

विरोधीपक्षाने सभात्याग केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विदर्भ, मराठवाड्यावर जिल्हा योजनांमध्ये अन्याय झाला आहे. आधीच्या वर्षीपेक्षा कमी पैसे दिलेत. आज उत्तरात जी आकडेवारी दिलीय, ती दिशाभूल करणारी आहे. नागपूर विभागातील जिल्ह्याच्या योजना २३ टक्क्यांनी कमी झाली. अमरावती विभागात जिल्ह्यांसाठी कमी पैसे दिलेत. तर, मराठवाड्यात अत्यल्प वाढ करण्यात आली असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.


Protected Content

Play sound