रावेर, प्रतिनिधी। तालुक्यात यंदा कमी पेरा असल्याने तुर खरेदी केंद्राला अल्पसा प्रतिसाद मिळत असुन आता पर्यंत १०७ शेतक-यां कडून ५० लाख २८ हजार ६०० रूपयाची ८६७ क्विंटल तुर नाफेडने खरेदी केली आहे.
तालुक्यात यंदा तुरीचा कमी पेरा असून खुप अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत खरेदी विक्री संघाने तालुक्यातील १०७ शेतक-यां कडून ५० लाख २८ हजार ६०० रुपयांची ८६७ क्विंटल तुर नाफेडने खरेदी केली आहे. अजुन तुर खरेदी व नोंदणीची अंतीम मुदत १५ मार्च असुन शासनाने प्रती क्विंटल ५ हजार ८०० रुपये भाव निश्चित केला आहे. तुर खरेदी सुरु असून ज्यांना द्यायची असेल त्या शेतक-यांनी खरेदी विक्री संघ येथे संपर्क करण्याचे अवाहन ग्रेडर प्रशांत पाटील यांनी केले आहे.