औरंगाबाद (वृत्तसंस्था) शिवजयंती तुम्ही दिमाखात साजरा कराल, संध्याकाळची शोभायात्राही मोठ्या थाटात पार पाडाल, मला याची खात्री आहे. त्याला कोणतंही गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या. तसेच शिवजयंती हा एक सण आहे, तो तिथीनुसारच साजरा व्हायला हवा. ३६५ दिवस शिवजयंती साजरी करायला हवी, असे आवाहनही मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना आज केले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे. आजचा दिवस महाराजांची जयंती ही कोणा एकाची जयंती नाही. ही महापुरुषाची जयंती आहे आणि तो आपला सण आहे. त्यामुळे तो सणासारखाच साजरा झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती उत्सव जोरात साजरा होईल, अशा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.