कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । कासोदा परिसरात अवैधी दारूविक्री मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे वृत्त ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने दिल्यानंतर पोलिसांनी परिसरात धडक कारवाई केली आहे.
याबाबत वृत्त असे की, कासोद्यासह परिसरात हातभट्टीच्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या संदर्भात ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’वर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत, कासोदा पोलिसांच्या पथकाने परिसरात धडक कारवाई केली आहे.
याच्या अंतर्गत कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निपाणे ता.एरंडोल येथे ३००० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ,पीएसआय नरेश ठाकरे , पो.ना.शरद राजपुत, पो.कॉ. दिपक आहिरे, महिला पो.ना. शमीना पठाण, पो.कॉ.महादू पाटील यांच्या पथकाने केली. यात आक्काबाई भिल या महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे.