चिंताजनक : इराणमध्ये दिवसभरात कोरोनामुळे ४९ जणांचा बळी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इराणमध्ये आज दिवसभरात कोरोनाने तब्बल ४९ जणांचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये आज एका दिवसात ४९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता १९४ इतका झाला आहे. विशेष म्हणजे २४ तासांत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे मृत्यू पावण्याची इराणमधली ही पहिलीच घटना आहे. कोरोनामुळे चीननंतर सर्वाधिक मृतांची संख्या सध्या इराणमध्ये आहे. इराणमधल्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. तर ६ हजार ५६६ जणांना लागण झाली आहे.

Protected Content