भुसावळ प्रतिनिधी । वरणगाव पोलीस स्टेशन आणि सिध्देश्वर नगर पोलीस पंचायत यांच्या संयुक्त विद्यामानाने जागतिक महिला दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या मुलींना ड्रेस देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बचतगटात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन सविता माळी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डि.वाय.एस.पी.सुरेश जाधव साहेब होते. कार्यक्रमाचे उटघाटक नगराध्यक्ष सुनिलभाऊ काळे व रोहीनी जावळे होते. प्रमुख पाहुणे भुसावळ सिटी पोलिस स्टेशनच्या समुदेशक भारती म्हैसके, वर्षा सुरळकर, हेमलता सोनवणे, प्रतिभा तावडे, तालुकाध्यक्ष संतोष माळी हे सर्व उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये अनाथ मुलगी मनिषा जाधव हिला शालेय साहित्या देण्यात आले. विभागीय पोलीस अधिकारी यांनी महिलांना कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी निलम जाधव, सहय्यक फौजदार सुनिल वानी, दत्तात्रय कुलकर्णी, संदिप बळगे, अक्षय हिरोळे, राहुल येवले, गजानन चव्हाण, बी.के.शेख, संगिता माळी, सरूबाई वाघमारे, निलिमा झोपे, कविता माळी, शोभा कोळी, कस्तुराबाई इंगळे, अनिता निकम, कलाबाई माळी, शांताबाई साबळे, भारती थोरात, परवीन बी, सविता चव्हान, लक्ष्मी बैरागी, यशोदाबाई कोळी, सुरेखा बावस्कर, कलाबाई सुरवाडे, योगेश सुरळकर, कीरण माळी, भुषण माळी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रूणाली माळी यांनी केले. आभार प्रदर्शन सविता माळी यांनी केले.