दादोजी कोंडदेवांना म्हटले शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक ; टीकेनंतर खा. उन्मेष पाटलांकडून पोस्ट डिलीट

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी दादोजी कोंडदेव यांना माता जिजाऊंचे प्रोत्साहन, शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक या आशयाची पोस्ट शनिवारी फेसबुकवर टाकली होती. त्यावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटायला लागल्यानंतर खा. पाटील यांनी ती पोस्ट आज दुपारी डिलीट केली आहे.

 

शनिवारी दादोजी कोंडदेव यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादनपर एक इमेज खासदार उन्मेष पाटील यांनी शेअर केली होती. फोटो शेअर करतांना तेथे माता जिजाऊंचे प्रोत्साहन, शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन असा मजकूर टाकला होता. यावर नेटकरी चांगलेच संतापले. इतिहास माहित नसेल, तर अशा पोस्ट टाकू नये, खा.पाटील यांनी माफी मागावी असे असंख्य कमेंट तेथे येऊ लागल्या. आज दुपारी साधारण दीड वाजेच्या सुमारास अखेर नेटकऱ्यांचा संताप लक्षात घेत, ही पोस्ट डिलीट केली आहे. दरम्यान, दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, यावरून ही टीका झालीय. याबाबत खासदार पाटील यांच्यासोबत संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Protected Content