केरळमध्ये आणखी ५ जणांना कोरोनाचा संसर्ग

केरळ (वृत्तसंस्था) केरळमध्ये रविवारी आणखी ५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी दिली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३९वर पोहोचली आहे.

याआधी देखील केरळमध्ये तीन लोकांचे कोरोना व्हायरसची टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्या तिघांनाही संपूर्ण उपचारानंतरच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. हे तिघेही चीनमधून भारतात परतले होते. केरळमध्ये कोरोनाबाधित नवे पाच रुग्ण पटनमथिट्ट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यांपैकी तीन लोक २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून परतले आहेत. तर इतर दोन जण त्यांचे नातेवाईक आहेत. या पाचही बाधितांना पटनमथिट्टा जनरल हॉस्पिटलमध्ये तपासणी आणि निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. शनिवारी रात्री त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी देखील केरळमध्ये ३ बाधित आढळले होते. कोरोना विषाणूचा फैलाव जिथून सुरु झाला त्या चीनमधील वुहान जिल्ह्यामध्ये ते वैद्यकीय शिक्षण घेत होते. या तीन विद्यार्थ्यांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content