मुंबई (वृत्तसंस्था) यस बँकेचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांना पीएमएलए कोर्टाने ११ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
आर्थिक संकटात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ३१ तास चौकशी केल्यानंतर आज पहाटे ४ वाजता त्यांना अटक केली होती. त्यानंतर यांना पीएमएलए कोर्टात हजर केले असता कोर्टाने ११ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. शनिवार पासून राणा यांची चौकशी केल्यानंतर दुपारी ईडी कार्यालयात त्यांना आणण्यात आले होते. त्यानंतर कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.