Home Cities धरणगाव धरणगाव येथील महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

धरणगाव येथील महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप


 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना नुकतेच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती, तुकाराम बीज, जागतीक महिला दिन तथा विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधुन शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांच्यासह शाळेच्या पर्यवेक्षिका पी.आर. सोनवणे तसेच शिक्षक बंधु – भगिनी यांच्या हस्ते शाळेतील ५० मुला – मुलींना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.टी. माळी सर यांनी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांचे शाळेच्या वतीने आभार मानले.


Protected Content

Play sound