अयोध्या वृत्तसंस्था । अयोध्या येथे उभारण्यात येणार्या श्रीराम मंदिरासाठी शिवसेनेतर्फे एक कोटी रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौर्यावर आहेत. या दौर्यात पत्रकारांशी बोलनांता अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी शिवसेनेकडून १ कोटींचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केलीय. भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही भाजपपासून बाजुला झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय.