Home क्राईम साताऱ्याजवळ भीषण अपघात ; ३ ठार !

साताऱ्याजवळ भीषण अपघात ; ३ ठार !


सातारा (वृत्तसंस्था) बोअरवेल ट्रक पलटी होऊन साताऱ्यात झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच ठार तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

बोअरवेल ट्रक वाई येथून खंडाळा येथे जात होता. या ट्रकमध्ये १३ कामगार होते. ट्रक भरधाव वेगात धावत होता. आज सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास खंबाटकी बोगद्याजवळील एस वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्याशेजारील कठड्याला धडकल्यानंतर पलटी झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound