पारोळा, प्रतिनिधी । तालुक्यातील शेळावे जि. प. उच्च प्राथमिक शाळा मोहाडी येथे इतिहास या विषयावर आधारित प्रश्न मंजुषा हा उपक्रम घेण्यात आला . यात विद्यार्थ्यांनी उत्सहात सहभाग घेतला.
मुख्याध्यापक जगदिश पाटील, उपशिक्षिका वंदना ठेंग, पदविधर शिक्षक सोमनाथ पाटील हे गुणवत्ता विकासाचे विविध उपक्रम सातत्याने राबवित असुन ठराविक दिवसांच्या अंतराने प्रत्येक वर्गाच्या झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न मंजुषा हा उपक्रम घेतात. याचा अध्ययनात विदयार्थ्याना खुप फायदा होत असुन ते जोमाने धडे वाचन करुन प्रश्न उत्तरे पाठांतर करून या उपक्रमात सहभागी होतात. यातुन त्यांना आनंददायी पद्धतीने शिक्षणही मिळत आहे. आपल्याला न आलेल्या प्रश्नांचे उत्तर त्यांना परत शिक्षकांकडुन सांगितले जात असल्याने विदयार्थ्यांना परत परत त्या त्या विषयाचा अभ्यास होत असुन चुका दुरुस्त करण्याची संधीही मिळत आहे. संपुर्ण शिकविल्या गेलेल्या अभ्यासक्रमचा त्यांचा सराव यातुन घडत आहे . आज झालेल्या इतिहास विषयावरील प्रश्न मंजुषेत तीन तीन गट ते म्हणजे रायगड , प्रताप गड व विशाळ गड असे करुन प्रत्येक गटातुन विजेते विदयार्थी निवडुन त्यांचे बक्षिस देऊन अभिनंदन करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे संपुर्ण शेळावे केंद्र व केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.