Home Cities एरंडोल म.फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांने विश्वास पाटील सन्मानित

म.फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांने विश्वास पाटील सन्मानित


एरंडोल (प्रतिनिधी) येथील शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास हरी पाटील यांना म.फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांने नुकतेच लातूर येथे सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद या शिक्षक संघटनेकडून विश्वास हरी पाटील (शिक्षण विस्तार अधिकारी बिट कासोदा ता एरंडोल) यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने स्वर्गीय दगडोजीराव देशमुख सभागृह लातूर येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे मा कुलुगुरु शिवराज नाकाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विनोद पाटील, डॉ.विलास पाटील,पप्पू पाटील राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ पंजाबराव देशमुख ,शिक्षण विचारवंत प्राचार्य विठ्ठलराव मोरे ,लोकेश पाटील,वसंत नेरकर ,राकेश पाटील आदी उपस्थित होते.अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या शिक्षक व प्रशासकीय अधिकारी यांना दिला जातो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound