यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथे प्राथमिक आरोग्य उप-केंद्राचे मुख्य इमारत बांधकामाचे भूमिपूजन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रक्षाताई खडसे होत्या.
याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणीताई खेवलकर खडसे यांनी संविधान उठाव शिल्पास पुष्पहर अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. यावेळेस मएकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीषदादा चौधरी, जि.प. अध्यक्ष ना. रंजनाताई प्रल्हाद पाटील, समाजकल्याण सभापती जळगाव जयपाल बोदडे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, बामणोदच्या सरपंच पल्लवीताई केदारे यांची उपस्थिती होती.
पं.स.यावल सदस्य कलिमा तडवी, उपसरपंच दिलीप भालेराव,शिवराम तायडे, पं.स.यावल माजी सभापती अलका जावळे,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी,माजी.जि.प.सदस्य डों.जे.डी.भंगाळे, साहेबराव केदारे, जेष्ठ सामाजिक नेते प्रभाकर झोपे,प्रभाकर सरोदे,वि.वि.का.सह.अध्यक्ष प्रमोद बोरोले, आरोग्य तालुका अधिकारी डों.हेमंत ब-हाटे, आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार योगेश इंगळे सर यांनी केले ग्रा.वि.अ. सुहास चौधरी, मिलिंद भोळे यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी व महिला व पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते.