भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरात कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या संशयित आरोपीस भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी रंगेहात पकडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत माहिती अशी की, बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील पटेल चहाच्या दुकानाजवळ सार्वजनिक ठिकाणी संशयित आरोपी तुषार प्रल्हाद बऱ्हाटे (वय-३०) रा. कोलते गल्ली हा कल्याण मटका जुगाराचा खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप परदेशी, पोहेकॉ संजय भदाने, पोना रमण सुरळकर, संदेश निकम, उमाकांत पाटील, महेश चौधरी, पोकॉ विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, सुभाष साबळे, बापुराव बडगुजर यांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील ८२० रूपये रोख व जगाराचे साहित्या हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंद कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.संदेश निकम करीत आहेत.