जळगाव प्रतिनिधी । मूळचे आसोदा येथील रहिवासी व सद्या भूतान येथे कार्यरत असलेले मेजर जनरल जगदीश बळीराम चौधरी यांना सैन्यदलाच्या संरक्षण क्षेत्रातील विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
नुकतेच लेफ्टनंट वाय. के. जोशी यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आधी सन १९८९मध्ये त्यांनी केलेल्या युद्ध क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीकरिता सेना मेडल देवून सन्मानित करण्यात आले होते. यासह त्यांनी संरक्षण क्षेत्रातील विविध सर्व कोर्सेस पूर्ण केले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण आसोद्यात झाले असून त्यांनी पुढील शिक्षण सातारा सैन्य स्कूल व एनडीएमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले आहे. सन १९८७पासून ते सैन्यदलात कार्यरत आहेत. यात त्यांनी कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, बिग्रेडीयर या महत्त्वाच् पदांवर यशस्वीरित्या कार्य केले आहे. उच्चन्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विश्वास चौधरी यांचे ते लहान बंधू आहेत. २६ जानेवारी २०१९ रोजी त्यांना हा सन्मान जाहीर झाला होता. त्याचे वितरण २७ फेब्रुवारीला दिल्ली येथील कार्यक्रमात करण्यात आले.