Home राजकीय सुप्रियाताईंना माझ्या कामाची पद्धत आवडत असेल : खा. खडसे

सुप्रियाताईंना माझ्या कामाची पद्धत आवडत असेल : खा. खडसे

0
28

 

रावेर, प्रतिनिधी । राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी माझी केलेली तारीफ’चे अर्थ-अनर्थ लावू नका. त्यांना माझे काम करण्याची पध्दत आवडते म्हणून मी आवडत असेल असे भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी रावेरमध्ये सांगितले.

राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे यांची केलेल्या कौतुकामुळे संपूर्ण जिल्हातील राजकीय वर्तुळ ढवळुन निघाले आहे. याबाबत रावेरमध्ये भाष्य केले. त्या पंतप्रधान मुद्रा योजना व शासकीय योजनांचा तालुकास्तरीय मेळावा निमित्त रावेरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत झेडपी अध्यक्षा रंजना पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन पाटील, प. स. सभापती जितेंद्र पाटील आदी भाजपा पदाधिकारी त्यांच्या सोबत होते.


Protected Content

Play sound