जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व शिक्षणशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास व प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन 3 ते 4 मार्च रोजी विद्यापीठात करण्यात आले आहे.
संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आदिवासी दुर्गम भागातून येत असतात. त्यामुळे त्यांना शहरी वातारणाशी जुळवून घेतांना बराच कालावधी लागतो. अशा विद्यार्थ्यांना एकत्रित आणून त्यांच्यातील सुप्तगुण विकसित होण्याच्या दृष्टिने त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उददेशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा नि:शुल्क आहे. प्राचार्यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पाठवावे. त्याकरीता शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मनीषा इंदाणी (मो.नं.9421542036), डॉ.संतोष खिराडे (मो.नं.9595425800)यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मनीषा इंदाणी यांनी केले आहे.