दिल्लीतील नागरिकांनी शांतता आणि बंधुता जपावी : मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत रहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्वाचे आहे, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

 

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दिल्लीतील परिस्थितीला गृहमंत्री अमित शाह जबाबदार असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

Protected Content