Home क्राईम दिल्ली हिंसाचार : भाजपा नगरसेवकाने वाचविला मुस्लीम परिवाराचा जीव !

दिल्ली हिंसाचार : भाजपा नगरसेवकाने वाचविला मुस्लीम परिवाराचा जीव !


delhi caa
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीत उसळलेल्या दंगलीतून हिंसक जमावाच्या तावडीतून भाजपाच्या स्थानिक नगरसेवकाने एक मुस्लीम कुटुंब आणि त्यांचे घर जळण्यापासून वाचवले आहे. प्रमोद गुप्ता असे या नगरसेवकाचे नाव असून ते यमुना विहार वॉर्डमधील भाजपाचे नगरसेवक आहेत. गुप्ता यांच्या कृतीने सामजिक सलोख्याचे सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे.

या घटनेची माहिती देताना सिद्दीकी यांनी सांगितले की, काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजी करीत एक मोठा जमाव आमच्या घराजवळून जात होता. या जमावाने आमच्या घराच्या खाली असणाऱ्या एका बुटिकला आग लावली. हे बुटिक आमच्या भाडेकरुचे होते. तसेच या भाडेकरुंच्या कारची आणि दुचाकीची देखील या जमावाने तोडफोड केली. परंतू गुप्ता हे आमच्या मदतीसाठी देवासारखे धावून आले आणि त्यांनी आमचे हिंसक जमावाकडून पेटवण्यापासून वाचवले.


Protected Content

Play sound