कै.अजय पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने अनाथ गतिमंद मुलांना अन्नदान

kasoda 5

कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या वनकोठे येथील ‘सहवास अनाथ गतिमंद मुलांची कार्यशाळा सोनबर्डी ‘ येथे डॉ. सुरेश पाटील यांनी आपले मित्र अतुल पाटील यांचा लहान भाऊ कै.अजय पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने अन्नदान व मिठाई वाटप केली.

कै. अजय पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने अनाथ गतिमंद मुलांना अन्नदान व मिठाई वाटप करण्यात आली. याप्रसंगी अतुल पाटील म्हणाले की , आपल्याला आपले उदरनिर्वाह करतांना किती गोष्टींना सामोरे जावे लागते , पण आशा अनाथ मुलांसाठी काय ? कोणी बघून जातात तर कोणी त्यांना होणारे व्यथांबद्दल बोलत असत. पण आपण समाजाचे काही देणं लागते या उद्देशाने डॉ.सुरेश पाटील यांनी १ क्विंटल गहू दिला व सर्व मुलांना मिठाई वाटप केली.

Protected Content