भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

bjp jalgaon

जळगाव, प्रतिनिधी ।महाविकास आघाडीच्या निष्क्रियते विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करत आहे. याच अनुषंघाने आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर भाजपतर्फे धरणे आंदोलन सुरु झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये एवढी मदत जाहीर केली होती. तसेच पुन्हा सत्तेत आल्यावर वाढीव मदत देण्याचे जाहीर केले होते. परंतु, महाविकास आघाडी सरकार देखील तेवढीच हेक्टरी ८ हजार रुपये एवढी देत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी असल्याचा आरोप कारणात येत आहे. तूर खरेदीचे निकष जाणीवपूर्वक बदलण्यात आला आहे. या व इतर समस्यांविरोधात भाजपचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करण्यात आला. महिलांवरील वाढते अत्याचार आदींचा निषेध यावेळी करण्यात आला. या आंदोलनात महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, राजेंद्र पाटील, मनोज भांडारकर, सुनील माळी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content