धक्कादायक : सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना स्वाईन फ्लूची लागण !

SupremeCourtofIndia

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी मंगळवारी कोर्टात यासंदर्भात माहिती दिली. सहा न्यायाधीशांना एच1एन1 विषाणूची लागण झाल्याने उपाययोजना करण्यासाठी सर्व न्यायाधीशांनी सरन्यायाधीशींसोबत बैठक घेतली. या बैठकीत ‘सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत’ असे आवाहन सरन्यायाधीश शरद बोबडे यांना केल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले. स्वाईन फ्लूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातील वकिलांना लसी उपलब्ध करुन दिल्या जातील, असा निर्णय घेण्यात आल्याचंही न्यायमूर्तींनी सांगितलं. स्वाईन फ्लूसारख्या आपत्कालीन परिस्थितीची काळजी घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करण्याची विनंती सरन्यायाधीशांना करण्यात आली आहे.

Protected Content