Home राजकीय राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर ; महाराष्ट्रातील ७ जागा

राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर ; महाराष्ट्रातील ७ जागा

0
102

election
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभारतील राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ७ जागांचाही समावेश आहे.

 

एकूण १७ राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर निवडून जाणरा आहेत. आजपासून महिनाभराने मतदान तर त्याच दिवशी म्हणजे २६ मार्चला संध्याकाळी ५ वाजता निकाल जाहीर होईल. राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील 55 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.


Protected Content

Play sound