खाकीतील माणुसकी; अपघातातील जखमीस दिला मदतीचा हात

bsl apghat

भुसावळ प्रतिनिधी । पोलिस ठाण्यास ठरवून दिलेल्या हद्दीच्या वादात न अडकता माणुसकी हा धर्म जोपासत क्षणाचाही विलंब न लावता अपघाताचे वृत्त समजताच आपल्या सहकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेवून जखमी व्यक्तीस उपचारार्थ रुग्णालयात दाखल करून प्राण वाचविले. या घटनेमुळे येथील बाजारपेठ पो.नि.दिलीप भागवत यांच्यामधील खाकीतील माणुसकीचे दर्शन शहरवासीयांनी अनुभवले.

याबाबत असे की, राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ २४ सोमवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या वाहनाने राजस्थान येथील ट्राली क्रमांक (आरजे ४७ जीए १३४२) या अवजड वाहनास कट मारला. यामुळे ट्रॉलीवरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व ट्राली उलटून पुलाखाली कोसळली. यात १ जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना येथे घडली.

हा अपघात शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत झाला नियमाने या ठिकाणी शहर पोलिसांचे कार्य आहे. तरीही घटनेची माहिती मिळताच हद्दीच्या वादात न अडकता बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून प्रथम जखमीला गोदावरी रूग्णालयात उपचाराकरीता पाठविण्यासाठी मदत केली. यामुळे जखमीचे प्राण वाचले. पो.नि. भागवत यांची कार्यतत्परता बघून उपस्थितांनी कौतुक केले. यातील मृताची ओळख अद्याप पटली नसून या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content