हिंगोणा विकासोच्या सदस्यांना कर्जमुक्ती

hingona karjmukti

यावल प्रतिनिधी । महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील हिंगोणा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सदस्यांचा समावेश असून आज त्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेत राज्यातील ६८ गावांसाठी पहिल्या टप्प्यात कर्जमाफी देण्यात आली. यात जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश आहे. यातील हिंगोणा येथील शेतकर्‍यांना गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत कर्जमुक्ती प्रदान करण्यात आली आहे. हिंगोणा येथील विकासो संस्थेचे एकूण सभासद संख्या १३५४ इतकी आहेत. त्यापैकी ३३४ सभासद हे संस्थेचे कर्जदार सभासद आहेत. त्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना, २०१९ अंतर्गत दिनांक ०१/०४/२०१५ ते ३१/०३/२०१९ या कालावधीत कर्ज घेवून दिनांक ३०/०९/२०१९ अखेर १३८ सभासद थकबाकिदार असून त्यांचे मुद्दल रुपये ७८.२३ लाख व व्याज रुपये १९.२८ लाख असे एकूण रुपये ९७.५१ लाख एवढ्या रकमेस पात्र आहेत.

हिंगोणा गावातील विविध कार्यकारी सोसायटीने १३८ शेतकर्‍यांची यादी पाठवली असून यात पहिल्या टप्प्यात १२० शेतकर्‍यांची यादी प्राप्त झाली असून या माध्यमातून ८२,७५,२७७ लाख रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. दरम्यान, आज सहाय्यक निबंधक यावल के. पी. पाटील यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी एम. पी. भारंबे मुख्य लिपिक यावल, पी. डी. पाटील तालुका लेखापरीक्षक यावल, विनोद देशमुख, यावल, पी. एन. राणे, ए. टी. तायडे, सी. के महाजन, विजयसिंह पाटील, सरपंच सत्यभामा भालेराव, तसेच शेतकरी छबु तडवी महेंद्र पाटील बाबु तडवी, नादर मन्यार, सुपडू तडवी, रविंद्र तायडे, नारायण चौधरी विकासो चेअरमन सागर महाजन यांच्यासह कार्यकारी मंडळ व कर्जमुक्तीस पात्र असलेले शेतकरी व ग्रामस्थ मोठया संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.

Protected Content