ट्रम्प यांचे अहमदाबादेत आगमन ; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत (व्हिडीओ)

ERhU6 yUYAEuJNk

अहमदाबाद (वृत्तसंस्था) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एअररफोर्स वन विमान अहमदाबाद विमानतळावर उतरले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले.

 

विमानतळाबाहेर दुतर्फा तिरंग्यासह अमेरिकेचा राष्ट्रध्वजही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. विमानतळावर ट्रम्प यांना भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जातोय. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका, जावई जेअर्ड कुश्नेर यांच्यासह त्यांच्या सरकारीमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. यानिमित्त अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत.

 

 

https://www.pscp.tv/w/1ZkKzLzXlvrJv

 

Protected Content