wp 15824755673511811932330752925144
क्रीडा, जामनेर

पहूरचा अर्णव जोशीने पटकावले जिल्हास्तरावर रौप्यपदक

शेअर करा !

पहूर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव यांच्या वतीने जळगाव येथील एम.जे. महाविद्यालयात रविवारी जिल्हा स्तरावरील स्केटिंग २०२०स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात पहूर येथील  अर्णव मनोज जोशी याने पुन्हा दमदार कामगिरी करून व्दितीय क्रमांक पटकवित जिल्हा स्तरावरील रौप्यपदक पटकविले आहे.

spot sanction insta

अर्णव जोशी याने मागील महिन्यात मलकापूर येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक मिळविले आहे. पुन्हा जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी करून रौप्यपदक पटकाविले आहे. आठ वर्ष वयोगटातील ही स्पर्धा घेण्यात आली असून रौप्यपदक व प्रमाणपत्र देऊन त्याला गौरविण्यात आले आहे.अर्णव हा लाँर्ड गणेशा इंग्लिश मेडिकल स्कुल चा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. क्रीडा शिक्षक आनंद मोरे  यांचे मार्गदर्शन लाभत आहे. येथील  वार्ताहर मनोज जोशी यांचा मुलगा तर सीए विनोद जोशी यांचा पुतण्या आहे.