धरणगाव, प्रतिनिधी । जिल्हा सहकारी देख रेख संघ्याचे अध्यक्ष ईश्वर चव्हाण यांनी थकित वेतन न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी याना दिला आहे.
थकित वेतन सोमवार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पर्यंत न मिळाल्यास त्याच दिवशी दुपारी ४. १५ वाजता आत्मदहन करू असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा सहकारी देखरेख संघाचे अध्यक्ष ईश्वर चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याना दिला आहे. जळगाव जिल्हा सहकारी देखरेख संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी थकित वेतन न दिल्याने ईश्वर चव्हाण यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यात काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा त्यांच्या जीवितास बरे वाईट झाल्यास त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक जळगाव व मुख्य कार्यकारी अधिकारी देखरेखा संघ जळगाव व त्यांच्या कर्मचारी यांची राहील असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.