वाघळी शिवारात चार झोपड्या जळून खाक : लाखांचे नुकसान

chalisgaon 1

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वाघळी येथील पाचोबा मंदिराजवळ आदिवासी वस्तीमधील चार झोपड्या रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास अचानक पणे लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये एकूण लाख रुपयांचा संसार बेचिराख झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे सदस्य पोपट भोळे ,मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश जाणे आदी  कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेत खासदार उन्मेश दादा पाटील यांना या घटनेची माहिती देण्यात आली. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घटनेचा तात्काळ पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर करावा असे तहसिलदारांना आदेश केले.व शासनाकडून जास्तीतजास्त भरपाई मिळवून देण्याचे सूचना केल्यात.

आदिवासी कुटुंबे उघड्यावर !
वाघळी शिवारातील पांचोबा मंदिरा जवळ आदिवासी समाजाची जुनी वस्ती असुन या ठिकाणी भिका सोमा मालचे, चिंतामण एकोबा सोनवणे, जिभाऊ  भिका  भिल्ल, गणेश भिका भिल्ल यांच्या झोपड्या रात्री दहा ते अकरा  वाजे दरम्यान अचानक आग लागून संपूर्ण जळून खाक झाली तरी सदर व्यक्तीना तात्काळ शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी तलाठी शिरसाठ यांनी पंचनामा केला यावेळी सदर घटनेची चौकशी करून त्यांना योग्य भरपाई मिळावी अशी मागणी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख, राष्ट्रीय समाज पक्ष ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश जाणे , जी.प. सदस्य पोपटतात्या भोळे, चांभार्डी उपसरपंच चंद्रकांत बागुल, पं.स.सदस्य सुभाष पाटील, सरपंच नेताजी पाटिल,  भाईदास  खैरे, निबा पाटिल, विलास पाटिल, वाघळी ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानग्रस्त गणेश मालचे यांचेकडे नवसाचा कार्यक्रम असल्याने त्यांनी किराणा व आहेराचा सामान नुकताच खरेदी केला होता हा सुमारे चाळीस हजार रुपयांचा माल जळून गेला आहे. ही आदिवासी कुटुंबे बाहेर झोपले असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content