सिंघम पोलीस अधिकार्‍याचे धमाल शिवभक्त नृत्य…सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल ! (video)

sachin atulkar dance

भोपाळ वृत्तसंस्था । मध्यप्रदेशचे सिंघम म्हणून ख्यात असणारे आयपीएस अधिकारी सचिन अतुलकर यांनी शिवभक्ताच्या अवतारामध्ये केलेले नृत्य सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.

भोपाळमध्ये आयपीएस मीट २०२० च्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील याप्रसंगी उपस्थित होते. सोहळ्यात अतुलकर यांनी शिवातील गाण्यांवर नृत्य केले. हातात धोतर आणि धुणी परिधान करुन त्यांनी रंगमंचावर सादर केले. अतुलकर यांचे हे नृत्य सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्या या अवताराचे कौतुक होत आहे. सचिन अतुलकर यापूर्वी यापूर्वी बर्याचदा चर्चा झाली आहे. अतुलकर यांचे शरीर अतिशय पीळदार असून ते कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्यात आहेत. आता त्यांच्यातील शिवभक्त आणि नृत्य नैपुण्य हे गुणदेखील उजेेडात आले असून याची एकच चर्चा सुरू आहे.

सचिन अतुलकर यांचा हा व्हिडीओ महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी उज्जैन पोलिसांच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला असून याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्याचे दिसून येत आहे. सचिन अतुलकर हे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आयपीएस झाले असून ते सध्या उज्जैनचे जिल्हा अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत रूबाबदार व्यक्तीमत्वाचे धनी असणार्‍या या सिंघम अधिकार्‍याला बिग बॉस-१३ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये सहभागी होण्याची ऑफरदेखील आली होती. अर्थात, त्यांनी ती नाकारली होती. आता महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा शिवभक्ताच्या अवतारातील डान्स चर्चेचा विषय बनला आहे.

खालील व्हिडीओत पहा सचिन अतुलकर यांचा शिवभक्त डान्स !

https://www.facebook.com/ujjainpolice/videos/214866213129813

Protected Content