Home Cities जळगाव सचिन कुमावत यांच्या ‘बँड कसा वाजना गोट्या ना लगीन मा’ या नव्या...

सचिन कुमावत यांच्या ‘बँड कसा वाजना गोट्या ना लगीन मा’ या नव्या गीताची धूम (व्हीडीओ)


sachin kumvat

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशातील लोकप्रिय कलावंत सचिन कुमावत यांचे ‘बँड कसा वाजना गोट्या ना लगीन मा’ हे नवीन गीत गुरुवारी रात्री प्रसारित झाले. अवघ्या काही तासात या गीताला साधारण दोन लाख लोकांनी पसंत केले आहे.

 

सचिन कुमावत यांच्या ‘मनी माय बबल्या इकस केसावर फुगे’ या गाण्याने मागील वर्षी खान्देशसह अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. या गीताला कोट्यावधी रसिकांचे युट्युबवर लाईक केले होते. सचिन कुमावत हे जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी गावातील रहिवाशी आहेत. कुमावत यांची अहिराणी भाषेतील अनेक गाणे प्रसिद्ध असून संपूर्ण खान्देशात त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे़.

 

‘बँड कसा वाजना गोट्या ना लगीन मा’ हे गीत देखील रसिकांच्या पसंतीस उतरत असून या गाण्यात हळदी समारंभातील गंमती चित्रित करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, हे गाणे देखील ‘युट्युब’वर ‘मनी माय बबल्या इकस केसावर फुगे’ या गीता प्रमाणे करोडो रसिकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास सचिन कुमावत यांच्या चाहते व्यक्त करताय.


Protected Content

Play sound