माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरोडे यांचे निधन

 

पारोळा, प्रतिनिधी । पारोळा नगरीचे माजी नगराध्यक्ष , लाडशाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण विठ्ठल शिरोडे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले.

स्व. लक्ष्मण शिरोडे यांच्या पश्चात ४ मुले , मुली , नातनातंवडे असा परिवार आहे. ते ओम सेल्स काॅरपोरेशनचे संचालक चंद्रकांत शिरोडे, बालाजी संस्थानचे भक्त प्रमोद शिरोडे, यांचे वडील तर लाडशाखीय वाणी समाज युवा मंचचे अध्यक्ष व त्यांचा वारसा कायम ठेवत शिरोडे प्रोव्हीजनचे संचालक सत्यजित शिरोडे यांचे बाबा होते.

Protected Content