पारोळा (प्रतिनिधी) येथील उत्कर्ष प्राथमिक शाळा व गजानन माध्यमिक विद्यामंदिर पारोळा यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. यावेळी विविध कार्यक्रम सादर करून चिमुकल्यांची धमाल उडवून दिली.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी विशेष म्हणजे शिक्षकांच्या विशेष परीश्रम यातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यात लपलेल्या कलाविष्कार बाहेर काढून विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे डांन्स, नाटीका, लावण्या, मनोरंजक चुटूकले , देश भक्ती पंर गीते , जन जागृती अभियान त्यात शौचालय उभारणे , प्लास्टीक बंदी , वृक्षतोड बंदी , स्वच्छ भारत सुंदर भारत अशा अनेक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमातून उत्कर्ष प्राथमिक शाळा व गजानन माध्यमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी मधील कलाविष्कार समस्त मंडळीला पहावयास मिळत होता.जनजागृतीसह देश भक्तीपर गीते तसेच इतर कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आमदार चिमणराव पाटील,माजी नगराध्यक्षा नलिनी पाटील, मृणालताई पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या ट्रॉफी व मेडल देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत झाले यानंतर उपस्थित मान्यवरांचे हस्ते राजे शिव छत्रपती यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून ,गजानन व सरस्वती मातेच्या प्रतिमांचे पूजन करून दिप प्रज्वलीत करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-अमोल चिमणराव पाटील, मृणालताई पाटील,माजी नगराध्यक्षा-नलिनी चिमणराव पाटील, गटशिक्षणाधिकारी पारोळा- चंद्रकांत मनोहर चौधरी, समाजसेवक-भागवत चौधरी, अशोक चौधरी,दै मर्डरचे देविदास चौधरी, शिवसेना महिला शहर प्रमुख-जयश्री दिलीप चौधरी,दिलीप चौधरी, राज्याध्यक्ष अपंग कर्मचारी संस्था-गुणवंत पाटील,हेमंत पाटील,गजानन माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक-गणेश जाधव, उत्कर्ष प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक-संदीप पाटील, पारोळा ग्रामस्थ व आझाद चौक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश कुमार प्रतापराव काटे यांनी केले. तर आभार संदीप पाटील यांनी मानले.